Vist us on
Ayursattva

Blog Archives

ध्यानाचा सराव

April 6th, 2020 by  / Total comments: 5
वर्तन चिकित्सेतील सिद्धान्तानुसार एखाद्या व्यक्तीचे ‘कंडिशनिंग’ झालेले असेल, तर त्याची प्रतिक्रिया चाकोरीबद्ध असते. हे ‘कंडिशनिंग’ बदलण्याचा किंवा स्वच्छ करण्याचा एक उपाय साक्षीध्यान हा आहे. ध्यान ही अंधश्रद्धा आहे, असा अनेक विज्ञानवाद्यांचा दृढविश्वास असतो. तर आध्यात्मिक माणसांना ‘ध्यान’ या शब्दाविषयी प्रेम असते; पण ध्यानाची दीक्षा आध्यात्मिक गुरूंकडूनच घ्यावी, असा त्यांचा आग्रह असतो. गुरूकृपेशिवाय ध्यान लागत नाही, […]
Read More

रोगांचे कारण

March 17th, 2020 by  / Total comments: 4
माणूस भावनेच्या आवेगात चुकीची कृती करतो त्याला सत्त्वावजय चिकित्सेत प्रज्ञापराध म्हणतात. साऱ्या शारीरिक आणि मानसिक आजारांचे ते एक कारण आहे. याचे तीन घटक आहेत. पहिला घटक म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य हे बुध्दीला कळलेले नसते. विचारांचा आणि भावनांचा परिणाम शरीर मनावर कसा होतो, तणावाचे दुष्परिणाम कोणते आहेत, ते कसे कमी करता येतात याची माहिती […]
Read More

साक्षी

March 17th, 2020 by  / Total comments: 0
मी मेंदूचा गुलाम नसून स्वामी आहे, ‘मी’ मनातील भावना बदलल्या की मेंदूतील रसायने बदलू शकतात. या ठिकाणी ‘मी’ म्हणजे कोण असा प्रश्न निर्माण होतो. तत्वज्ञानाची चर्चा न करता या ‘मी’ ला साक्षीभाव, ओब्सर्विंग सेल्फ म्हटले जाते. ध्यानावर आधारित परदेशात वापरले जाणारे मानसोपचार आणि आयुर्वेदातील सत्त्वावजय चिकित्सा यांचे ध्येय हा साक्षीभाव विकसित करणे हेच असते. आधुनिक […]
Read More

साक्षी ध्यान

March 8th, 2020 by  / Total comments: 0
योग आणि आयुर्वेद यामध्ये अंतःकरण आणि शरीर हे पांच महाभूतानी आणि त्रिगुणांनी बनलेले असते असे मानले आहे. त्या दृष्टीने त्यांच्यात अद्वैत आहे, स्थूल शरीराचा सर्वात सूक्ष्म भाग म्हणजे अंतःकरण होय. त्याचमुळे मनातील विकारांचे, भावनांचे शरीरावर परिणाम होत असतात आणि ते जाणता येतात हे आयुर्वेदात सांगितले आहे. मल,मुत्र विसर्जन, भूक, तहान यांची जाणीव शरीरात काही संवेदना […]
Read More

अंतःकरण

March 3rd, 2020 by  / Total comments: 0
योग, आयुर्वेद यामध्ये माणसाच्या अंतरविश्वाला अंतःकरण असे नाव दिलेले आहे. त्याचे मन, बुद्धि, अहंकार आणि चित्त असे चार भाग आहेत. माणसाला बाह्य जगाचे ज्ञान ज्ञानेंद्रिये करून देत असली तरी तेथे मन नसेल तर ते ज्ञान होत नाही. इंग्रजीत अटेन्शन या शब्दाने जे सांगितले जाते ते मनाचे एक कार्य आहे. मन विचारात असले तर शरीराला होणाऱ्या […]
Read More
1 2 3 4

Recent Posts

Categories

Archive