Vist us on
Testimonials

Testimonials

Hi Myself Leena Jadhav working in Emcure Pharmaceuticals limited Hinjiwadi as a Microbiologist. I m 35 and having one child.Basically I am from Nagpur and settled down in Pune since last 10 years.

It’s general tendency of human mind to get affected because of minor issues in our day to day life, I m one of them. Thanks to sipe mindfulness meditation which helped me to certain extent to cope up with problems effectively. THANK YOU

I adv. Indraneel Thakur Devgad. Age 40. I m practicing sakshi dhyan since last one and half year. I was hyper and angry in nature and suffering from BP and stress. Once I started mindfulness and dhyana..I am enjoying my life as free bird. No BP… no stress..It has changed my life.

Hii everyone… I am krushna Narote (23), living in pune working in IT company as software developer. Few months ago I was totally depressed due to some reasons but practicing satvavajay program and guidance form Dr yash I am able to handle complicated situations and quite stable as compare to few days before…. Thanks a lot to Dr yash…

I am Suhas bille from kolhapur. Working as medical representative. Since last 6 month practicing meditation and getting benefits of practice in day to day life

I am Avinash Gohad Sectional Engineer Zp Wardha.I m regularly practice ing sakshi dhyan & Very beneficial for me

I am Madhav Pandit, 45, living in Pune… I am working in Infrastructure Company as Liaison Manager…

I am practicing meditation of sattvavajay and my listening capacity, my responses and patience has incraesed many folds…

Still a long way to go… I sincerely thank Dr.Velankar Sir for designing this wonderful system…

Myself Prasad Dharu from Pune. I work in Pharma company in Pune. Meditation sessions have brought lot of changes in my personality. I was always use to be stressed out however after practising and doing meditation I am feeling much relaxed and finding out charged with new energy. Thx to Dr. Welankar for coming in our life and helping us out in any situation.

मी मुकुल ढोबळे, नुकतेच MBBS पूर्ण झाले असून सध्या PG साठी अभ्यास सुरु आहे. मी औरंगाबाद स्थित असून गेली 7 ते 8 महिने माईंडफुलनेस चा सराव करत आहे. लोकमत मध्ये येणाऱ्या लेखमालेद्वारे डॉ. यश सरांशी संपर्क झाला. सरांच्या मार्गदर्शनाने सराव सुरु केला आणि तेव्हापासून खूप सारे बदल होत आहेत व ते साक्षिभावाने बघता ही येत आहेत. Emotional stability कमालीची वाढली असे निश्चित सांगू शकतो. आयुष्यातील आनंद वाढत आहे कारण तो बाह्य घटकांवर अवलंबून नसतो हे हळूहळू जाणवत आहे. अजून खूप प्रगती बाकी आहे. डॉ यश सरांच्या मार्गदर्शनाने आपण सर्व जण माईंडफुलनेस सराव अविरत सुरु ठेवुयात.

धन्यवाद 🙏

नमस्कार सर्वांना..

मी सीमा जोशी. पुण्याजवळ तळेगाव दाभाडे येथे रहात असून एका Co-operative बँकेत सिनीयर ऑफिसर आहे. 15 दिवसापूर्वी च मला या प्रोग्रमाची माहिती समजली आता मी अँप वरील ऑडियो ऐकून सराव करते. सध्या माझी सुरूवात आहे.पण आता पर्यंत केलेल्या सरावाचा मन शांत व स्थिर होण्यासाठी खूपच उपयोग झाला आहे. अर्थात डाॅक्टर वेलणकर सरांचे बहुमोल मार्गदर्शन वेळोवेळी लाभत आहेच. खूप चांगले योग्य वेळी हाती लागल्याचे समाधान आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर ची मी नक्की च वेगळी असेन याबाबत खात्री आहे. धन्यवाद 🙏

नमस्कार मी विवेक थावरे, पुण्यात असतो आणि एलआयसी मध्ये नोकरी करतो. दररोज किमान २० मिनिटे ऑडियो ऐकून ध्याना चा सराव करतो आणि दिवसभरात बऱ्याच वेळेला मी जाणीवपूर्वक सजग राहतो.

धन्यवाद 🙏

माझे नाव आनंद बामणे,रा नांदेड, व्यवसाय वकील, शेती असून, गेली 2013 पासून दारू व्यसनातुन व्यफल्यग्रस्त होतो, माझे सर्व मार्ग संपलेले होते,फेब्रुवारी 2018 लोकमत, श्वाचा स्पर्श या लेख तुन मा डॉ. यश वेलणकर साहेबाची ओळख झाली,आणि मी सतत त्यांचे लेख वर्षभर वाचन, चिंतन, अनुकरण, करीत असताना गेली 6 महिने पासून ऑडिओ प्रत्यक्ष सराव करिता आहे, आणि मी आज गेली दीड वर्ष व्यसनमुक्त असून मला वेळोवेळी व्यक्तिगत मार्गदर्शन केले, या सजगता सरावमूळे माझे पुर्नजन्म झाले, व परिपूर्ण पूर्वपदावर येत आहे, आज मला प्रत्यक्ष सराव ची आवश्यकता भासत नाही,या सराव मूळे क्षणो क्षणी निर्णय घेऊन खऱ्या जीवनाचा मार्ग मिळत आहे,ग्रुप मध्ये विनंती आहे,सराव करतेवेळी नकोसे वाटते ,कंटाळा येतो पण परत परत सराव केल्यास नक्कीच फायदा होतो, वादळात दिवा लावण्याचा श्रय हे यश साहेबांचे च 🙏🙏

नमस्कार…

मी रुपा मडकईकर.

परेल मुंबई येथे २५ पेक्षाही अधिक वर्षं वैद्यकीय व्यवसाय करत आहे. त्यात स्रीरुग्ण चिकित्सा अधिक आहे.

वेलणकर सरांचे ‘ध्यान विज्ञान’ हे पुस्तक ऑक्टोबर २०१७ मध्ये वाचनात आले आणि आयुष्यच बदलून गेलं.ध्यानाचं इतक्या शास्त्रोक्त पद्धतीने आणि सर्व समावेशक वर्णन आणि त्याच्या परिणामांचे अतिशय तटस्थपणे विश्लेषण त्यात आहे. वेगवेगळ्या ध्यानाच्या प्रकारांचा शरीरावर होणाऱ्या परिणामांचे विज्ञाननिष्ठ विवेचन त्यात केलेले आहे.. त्यानंतर सरांचा परिचय झाला व साईप माईंड अँप वरून ध्यानाचा कोर्स केला.

इतक्या विस्ताराने लिहिले कारण माईंडफूलनेस मेडिटेशन, साक्षी ध्यान हे वेलणकर सरांनी दिलेले वरदानच आहे. प्रत्येकानेच याचे शिक्षण घ्यायला हवे. ही काळाची गरज आहे असे मनापासून वाटते..

सरांना मन:पूर्वक धन्यवाद.

नमस्कार मी डॉ. सुजाता कुंभार मी पेठवडगाव येथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. साक्षी ध्याना चा मला स्वतःला व माझ्या पेशंट ना खूप उपयोग झाला आहे

नमस्कार माझे नाव विष्णू देशमुख, नोकरी, पुणे. गेली दोन वर्षे minfullness चा अभ्यास आणि प्रॅक्टिस करतोय, खूप बरं वाटतय, अचानक आलेल्या चिंतमुळे खूप अस्वस्थ होतो, व्हाट्सअप्प च्या द्वारे डॉक्टरांची ओळख झाली आणि नवीन पालवी फुटली, शरीराला आणि मनाला बघायला शिकलो, गोष्टी सुसह्य झाल्या, अजूनही त्रास चिडचिड होते, but can see as a game, it’s mind game…😃😃

मी Dr. Chobhe Suvarna from Ahmednagar doing general practice in Nagar. मी सहा महिन्यांपूर्वी सरांचा mindfullness programm attend केला. App घेतले व daily practice suru केली. Tremendous changes झाले. साक्षीभाव विकसित झाल्याने शारीरिक complaints तसेच भावनिक उतार चढावांकडे तटस्थपणे बघण्याची सवय झाली व या उतार चढावांचे दुःख करणे बंद झाले. Acceptance वाढला. बाहेरील situation कितीही change झाल्या तरी मी आनंदी राहू शकते याची खात्री झाली. Body sensations, emotions, thoughts येतात आणि जातात. Non judgemental observation dissolves the situation and we can enjoy each and every movement of life हे पक्के ध्यानात आले. अजून सुरुवात आहे खूप प्रगती बाकी आहे . सरांचे guidence खूप छान आहे. Follow up खूप छान ठेवतात. स्वतः ला change करत वेळ मिळेल तसे patient ला पण guidence करण्याची इच्छा आहे. सत्ववाजाय चिक्तित्सा कोर्स पण join करणार आहे. अजून detail knowledge भेटेल. सरांचे खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

नमस्ते माझे नाव सागर गुरव.

मी खरसुंडी – जिल्हा सांगली येथे असून माझा ज्योतिष व वास्तु शास्त्र चा व्यवसाय आहे.

लोकांच्या समस्या ऐकून ऐकून मी कधी समस्या ग्रस्त झालो हे समजलेच नाही.

आणि हे ही समजले नाही की मी समस्याग्रस्त झालो आहे.

मग एक ग्रुप वरून वेलणकर सरांचा मेसेज आला.

मग 2018 मध्ये मी यश वेलनकर सरांचे माइंडफुलनेसचे अँप ऑनलाईन विकत घेतले.

सुरवातीचे 8 महिने मी काही सराव केला नाही. मला वाटले यानी काय होणार आहे. हीच माझी चूक होती.

इतर सर्व प्रयन्त करून झाले कशाचा उपयोग होत नव्हता.

फेब्रुवारी 2019 पासून पुन्हा सराव सुरू केला.

त्याचा मला व्यक्तिगत आयुष्यात खूपच फायदा होत आहे.

मी आता समस्या बऱ्यापैकी कमी झालेले आहेत पण मी समस्या किती कमी झाल्या हे न पाहता मी सजग किती आहे हे पाहतो.

यश वेलणकर सरांचे खूप खूप आभार.

आणि सरांना व्हाट्सअप्प वरून कितीही प्रश्न केले तरी सरांनी उत्तर देण्याची कधी टाळा टाळ केली नाही. हा ही त्यांचा मोठेपणा.