Vist us on
आघातोत्तर तणाव / Post-Traumatic Stress Disorder (PTSD)

Blog

आघातोत्तर तणाव / Post-Traumatic Stress Disorder (PTSD)

January 4th, 2020 by  / Total comments: 1
Please click here for the English version

एखादा भयानक प्रसंग घडल्यानंतर त्याचे दुखः काही काल वाटते,ते स्वाभाविक आहे पण काही माणसात सहा महिने होऊन गेले तरी ते दुखः हलके होत नाही.सतत त्याच आठवणी येत राहतात, भीती वाटते.या त्रासाला आघातोत्तर तणाव म्हणतात. आघातीत्तर तणाव म्हणजे पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर नावाच्या आजारात अमाय्ग्डलाची संवेदनशीलता वाढलेली असते. एखाद्या माणसाने शारीरीक किंवा मानसिक आघात झेलला असेल त्याच्या प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला असेल, त्याने एखादा भयानक अपघात पाहिला असेल किंवा भूकंप,वादळ यामुळे झालेली वाताहात अनुभवली असेल तर बराच काल उलटून गेल्यानंतर देखील त्या आठवणी कायम राहतात, मनात अस्वस्थता राहते,भीतीचे सावट राहते.झोप नीट लागत नाही, लागली तरी भीतीदायक स्वप्ने पडतात.अचानक भीतीचे झटके येतात .असा त्रास असेल त्यावेळी माईंडफुलनेस थेरपी उपयोगी ठरते असे संशोधनात दिसत आहे.

मानवी मेंदू उत्क्रांतीने बदलत आलेला आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये फक्त जैविक मेंदू असतो.तो भूक,भय आणि लैंगिक आकर्षण एवढेच जाणतो.माणसामध्ये हि तो असतोच,ब्रेन स्टेम,मेड्युला,हायपोथॅलॅमस म्हणजे हा जैविक मेंदू,सर्व अनैच्छिक शारीर क्रियांचे नियंत्रण तो करतो.त्याला प्रेम वगैरे भावना समजत नाहीत. म्हणूनच साप त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्पमित्राला चावण्याच्या अनेक घटना घडतात. आघातोत्तर तणाव असताना छातीत धडधड होते ,ती या जैविक मेंदुमुळेच होते. सस्तन प्राणी म्हणजे बैल,कुत्रा यांच्यामध्ये जैविक मेंदुबरोबर भावनिक मेंदूही असतो.मेंदूतील लीम्बिक सिस्टीम नावाच्या भागात या गुंतागुंतीच्या भावनांचे नियंत्रण होते,त्यामुळे कुत्रा,बैल,मांजर हे प्राणी आपल्या मालकावर प्रेम करतात. माणसाच्या मेंदूतही हा भाग असतो.अमाय्ग्डला,हाय्पोथालामास,हिप्पोकाम्पस या मेंदूतील भागांना भावनिक मेंदू म्हणता येईल.भीतीच्या आठवणी,आघाताच्या आठवणी मेंदूच्या याच भागात असतात. सेरेब्रल कोर्टेक्स नावाचा मेंदूचा भाग,ज्याला वैचारिक मेंदू म्हणता येईल,तो माणसाप्रमाणेच गोरिला,चिपांझी यासारख्या अधिक उत्क्रांत झालेल्या काही माकडांच्या मेंदूतही असतो. पण प्रीफ्रन्टल कोर्टेक्स (prefrontal cortex) नावाचा मेंदूचा सर्वात पुढे असणारा भाग हा फक्त मानवामध्येच असतो, हा भाग अन्य प्राण्यात अविकसित असतो.

निरोगी माणसाच्या मनात भावना असतात त्यावेळी भावनिक मेंदूतील अमाय्ग्डला नावाचा अवयव सक्रीय असतो, पण त्याच बरोबर प्रीफ्रन्टल कोर्टेक्स देखील याच वेळी सक्रीय असतो. मेंदू तज्ञ असे मानतात कि प्री फ्रंटल कॉर्टेक्सचे हे उत्तेजन अमाय्गाडलाला नियंत्रणात ठेवण्यासाठी असते. तो सक्रीय असतो त्यामुळे माणसाला राग येतो पण त्याने तो बेभान होत नाही. राग योग्य वेळी,योग्य माणसासमोर ,योग्य पद्धतीने कसा व्यक्त करता येईल याचा तो विचार करू शकतो. याउलट आघातोत्तर तणाव म्हणजे पोस्ट ट्रोमॅटीक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) हा आजार असेल अशा माणसात किंवा ज्यावेळी मनात राग,नैराश्य या विघातक भावनांची तीव्रता खूप जास्त असते त्यावेळी प्री फ्रंटल कॉर्टेक्स शांत असतो आणि अमाय्गाडला उत्तेजित झालेला असतो.याच अवस्थेला इमोशनल हायजॅक असा शब्द वापरला जातो.माणूस रागाने बेभान होतो त्यावेळी भावनिक मेंदूने वैचारिक मेंदूला हायजॅक केलेले असते.तो इतक्या पटकन प्रतिक्रिया करतो की त्यामुळे वैचारिक मेंदूला काम करण्याची संधीच मिळत नाही. अशा वेळी माणसाचे वागणे सैराट होते, तो भावनेच्या भरात चुकीची कृती करतो. त्याचमुळे तीव्र रागाच्या भरात खून होतात आणि तीव्र नैराश्यामुळे आत्महत्या घडते.

साक्षी ध्यानाच्या वेळी नेमकी याच्या उलट स्थिती आपल्या मेंदूत असते. असे ध्यान करीत असताना मेंदूचे परीक्षण केले तर या वेळी प्री फ्रंटल कॉर्टेक्स सक्रीय असतो पण अमाय्गाडला उत्तेजित झालेला नसतो,त्याची सक्रियता कमी असते . याचे कारण असे ध्यान करीत असताना, माईंडफुलनेस चा सराव करीत असताना आपण शरीरावरील संवेदना जाणतो पण जे काही जाणवते आहे त्याचा स्वीकार करतो.ही संवेदना चांगली आणि ही वाईट अशी प्रतिक्रिया करीत नाही.अमाय्ग्डला चे काम शरीरातील संवेदनाना प्रतिक्रिया करणे हेच आहे.नेहमीच्या आयुष्यात या संवेदना तीव्र होतात त्याचवेळी आपल्याला जाणवतात. आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीत सतत काहीतरी घडत असते आणि त्याला अमाय्ग्डला प्रतिक्रिया करीत असतो. शरीरात काहीतरी होते आहे ते खूप धोकादायक आहे असा अर्थ अमायाग्डला लावतो आणि तीव्र प्रतिक्रया देतो.सत्वावजय चिकित्सा मध्ये थेरपीस्ट आघातोत्तर तणाव असलेल्या व्यक्तीला थोडा थोडा वेळ शरीरातील संवेदना जाणत त्यांचा स्वीकार करायची प्रेरणा देतो.असे केल्याने मेंदूतील प्री फ्रंटल कॉर्टेक्स विकसित होतो,त्याच्यामध्ये नवीन पेशी निर्माण होतात.या आजारात अमाय्गाडला अती संवेदनशील झालेला असतो,काहीवेळा त्याचा आकार देखील वाढलेला असतो. माईंडफुलनेस थेरपीने ही अती संवेदनशीलता कमी होतेच आणि रोज वीस मिनिटे असे दोन महिने माईंडफुलनेस मेडीटेशनचा सराव केला तर वाढलेला अमाय्गाडला संकुचित झालेला दिसून येतो.त्यामुळे या आजाराचे मूळ कारण दूर होते.

या आजारात शरीरातील संवेदना खुपच त्रासदायक असतील तर जाणीव पूर्वक श्वासाची गती बदलवून , थोडा वेळ दीर्घ श्वास घेतला तर अस्वस्थता कमी होते. असा दीर्घ श्वास घेणे म्हणजेच आपल्या शरीर क्रियांची जाणीव आणि त्यांचे नियंत्रण हे प्री फ्रंटल कॉर्टेक्सचे काम आहे. तो निरोगी चिंता लक्षात घेऊन भविष्याचे नियोजन करू शकतो,इतर प्राणी असे नियोजन करू शकत नाहीत. अन्य प्राण्यांचे ट्रेनिंग म्हणजे त्यांच्या मेंदूचे इतरांनी बदललेले प्रोग्रामिंग असते,अन्य प्राणी स्वताचे प्रोग्रामिंग स्वतः बदलू शकत नाहीत.माणूस हा एकमेवाद्वितीय प्राणी आहे जो स्वताचे प्रोग्रामिंग बदलू शकतो,स्वतःचा स्वभाव बदलवू शकतो,अंध प्रतिक्रिया न देता योग्य प्रतिसाद निवडू शकतो.फक्त माणसालाच नैतिकेतेची,अनैतिकतेची जाणीव असते आणि त्यालाच अचानक नवीन काहीतरी सुचू शकते. आत्मभान ,स्वतःच्या विचारांची आणि भावनांची जाणीव हेही प्री फ्रंटल कॉर्टेक्स कार्य आहे. केवळ माणसाला लाभलेली हि सर्व वैशिष्ट्ये प्री फ्रंटल कॉर्टेक्समुळेच शक्य होतात.माणसाला माणूसपण मेंदूतील या भागामुळेच मिळत असते.

सत्वावजय चिकित्सा म्हणजे याच प्री फ्रंटल कॉर्टेक्सला दिलेला व्यायाम आहे.तो विकसित झाला, कार्यक्षम झाला की अमाय्ग्डालाला नियंत्रणात ठेवू शकतो.त्याची अकारण ,सतत प्रतिक्रिया करण्याची सवय बदलवतो त्यामुळे आघातोत्तर तणावाचा त्रास कमी होतो.

Post-traumatic stress disorder

After a traumatic event, it is natural to feel sad for some time, but in some people it does not ease the pain after six months. Post-traumatic stress is the increased sensitivity of the amygdala to a condition called post-traumatic stress disorder. If a person has suffered physical or mental trauma, his loved one has died suddenly or he has witnessed a horrific accident or an earthquake, storm, the memories of those days, remain unsettled. Discomfort in mind continues with sleeplessness. Ayurved Sattvavajay therapy seems to be helpful when there is such a problem.

1 Comment

  • By Nick, January 16, 2020 @ 2:49 pm

    Useful

Other Links to this Post

RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a comment

Recent Posts

Categories

Archive