कोरोना रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी आवश्यक ते सारे उपाय करायला हवेतच. मात्र सतत हात धुताना किंवा एखाद्या माणसाशी बोलताना देखील आपल्या मनात कोरोनाचा विचार येत असतो आणि तो चिंता वाढवतो.
असे विचार येणे स्वाभाविक आहे. मात्र सतत असे त्याच विचारात राहिल्याने कोरोना झाला नाही तरी चिंता रोग आणि मंत्र चळ म्हणजे ओसिडी होण्याची दाट शक्यता आहे.
सततची चिंता आपली रोग प्रतिकार शक्ती कमी करते आणि त्यामुळे कोरोनाचा जंतू आपल्या आसपास नसताना देखील सर्दी, ताप, खोकला होऊ शकतो. कारण ही लक्षणे निर्माण करणारे इतर जंतू हवेत नेहमीच असतात. असा त्रास होऊ लागला की पुन्हा चिंता वाढते आणि दुष्टचक्र सुरू राहते.
यावर उपाय म्हणजे सजगता आणि साक्षिभावाचा नियमित सराव! सजगता म्हणजे आपले लक्ष पुनःपुन्हा वर्तमान क्षणात आणायचे.हात धुताना पाण्याचा स्पर्श जाणवतो, तेथे ध्यान द्यायचे.
चिंता असेल तर छातीवर भार जाणवतो तोही लक्ष देऊन पहायचा.
साक्षी भाव म्हणजे शरीरात आणि मनात जे काही जाणवते त्याला प्रतिक्रिया न करता त्याचा स्वीकार करायचा.असे केल्याने सध्या असलेल्या तणावाचे दुष्परिणाम कमी होतील, रोग प्रतिकारशक्ती सक्षम राहील आणि आपले स्वास्थ्य चांगले राहील.
सजगता आणि साक्षी भावाचा सराव सोपा व्हावा यासाठी खालील अॅप मधील ऑडियो मदत करू शकतात. टी व्ही वर त्याच त्या बातम्या पुन्हापुन्हा पाहत राहण्यापेक्षा या ओडियोंचा सराव अधिकाधिक वेळ केला तर कोरोनाचे संकट आपल्यासाठी एक वरदान ठरेल. कारण त्यामुळे आपण या सरावासाठी वेळ देऊ शकतो.
हा सराव सोपा होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून अॅप इंस्टॉल करा. तळाला फ्री रजिस्ट्रेशन लेबल क्लिक करून रजिस्टर here लिंक वापरून माहिती भरा.
सध्याच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या मानसिक अस्वस्थतेविषयी कोणतीही माहिती हवी असेल तर +91 46364940 नंबर वर व्हॉट्स अॅप मेसेज करून विचारा.
No Comments
No comments yet.
RSS feed for comments on this post. TrackBack URI
Leave a comment