रस्त्याने चालणारा एखादा माणूस माणूस अनेक ठिकाणी नमस्कार करीत जातो आहे असे तुम्ही पाहिले असेल. काहीजण जेवायला बसल्यानंतर तीन चार वेळा हात धुवायला जातात. अशा माणसाच्या या कृत्याला मंत्रचळ म्हणतात. तसे आपण सर्वच जण थोडेसे मंत्रचळी असतो दाराला कुलूप लावतो आणि चालायला लागतो पण चार पावले गेल्यानंतर आपल्या मनात शंका येते की कुलूप नीट लागले आहे की नाही. आपण परत येऊन कुलूप ओढून पाहतो. आपले परत येऊन कुलूप पाहणे कुलूप लावताना सजगता नसल्याने होते. असे एकदा झाले तर ठीक आहे पण मंत्रचळ असणारी व्यक्ती चारचार वेळा पुन्हापुन्हा येऊन कुलूप ओढून पाहते. असे होते त्यावेळी त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर दुष्परीणाम होऊ लागतात. हेच प्रमाण वाढते, मनातील विचारामुळे अस्वस्थता येऊ लागते त्याला ओसीडी म्हणजे ऑबसेसिव कम्पलसिव डिसऑर्डर म्हणतात. मंत्रचळ आणि ओसीडी यामध्ये फरक आहे.
मंत्रचळ असणारी व्यक्ती अस्वस्थ नसते. तिच्या वागण्याने कुटुंबीय अस्वस्थ होत असतील. पण त्या व्यक्तीला त्यात काही चुकीचे वाटत नसते. मंत्राचळी माणसाकडून केल्या जाणाऱ्या कृती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. संगणक नक्की शट डाऊन झाला आहे की नाही हे पुन्हापुन्हा पहाणे, घरातून बाहेर पडताना घरात असलेल्या देवांच्या आणि पुर्वजांच्या सर्व फोटोना नमस्कार करणे अशी मंत्रचळपणाची अनेक उदाहरणे पहायला मिळू शकतात. असे वागणे इतरांना आणि त्या व्यक्तीला फारसे त्रासदायक वाटत नाही. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र असे वागणाऱ्या माणसाच्या मनात चिंता आणि अस्वस्थता असते. आपण नमस्कार केला नाही तर काहीतरी वाईट घडेल असा विचार त्या व्यक्तीच्या मनात येत असतो. त्यामुळे नमस्कार करण्याची कृती होत असते. काहीजण एखादा शब्द किंवा मंत्र मोठ्याने म्हणतात, पुनःपुन्हा म्हणतात. म्हणूनच अशा वागण्याला मराठीत मंत्रचळ शब्द रूढ झाला असेल. असा मंत्र म्हणण्यात किंवा नमस्कार करण्यात आक्षेपार्ह फारसे काही नाही, त्या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा फारसा दुष्परिणाम होत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते .पण तो शब्द म्हटला नाही किंवा नमस्कार केला नाही तर अस्वस्थ वाटत राहते, भीती वाटते हे मानसशास्त्रानुसार चिंता रोगाचे प्राथमिक लक्षण आहे. काही काळाने हि सवय त्रासदायक पातळीवर जाऊ शकते. त्या व्यक्तीला ऑबसेसिव कम्पलसिव डिसऑर्डर हा विकार होऊ शकतो. भारतात एक टक्का माणसांना हा आजार आहे असे संशोधन आहे.
ओसीडी असलेली व्यक्ती सतत अस्वस्थ असते. आपले वागणे चुकीचे आहे हे तिला समजत असते पण ते ती थांबवू शकत नाही. त्यामुळेच अस्वस्थता वाढत जाते. कृती करण्याचे कंपल्शन त्या व्यक्तीला वाटत असते म्हणूनच या आजाराच्या नावात तो शब्द आहे. या आजाराचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात कृती करण्याचे कम्पल्शन असते. दुसऱ्या प्रकारात मात्र अशी कृती असतेच असे नाही. असा त्रास असणाऱ्या व्यक्तीच्या मनात एकच विचार परतपरत येतो आणि त्या विचाराचीच तिला भीती वाटू लागते. छोटे बाळ असलेल्या काही स्त्रियांना हा त्रास होतो त्यावेळी माझ्या बाळाला मी काहीतरी इजा करेन असा विचार त्या मातेच्या मनात येत राहतो. या विचारामुळे ती अस्वस्थ होत राहते. काही माणसांना सेक्स विषयीचा विचार पुनःपुन्हा येत राहतो. त्यामुळे हे पुरुष स्त्रियांशी नीट संवाद साधू शकत नाहीत. त्यांना मनात येणाऱ्या विचारामुळे त्यांना अपराधी वाटत राहते. आपल्या प्रिय व्यक्तीला किंवा स्वतःला अपघात होईल, आपल्या जोडीदाराचे अनैतिक संबंध आहेत, कुणीतरी आपल्यावर करणी केली आहे, आपले आर्थिक नुकसान होऊन दारिद्र्य येईल या सारखा कोणताही एक विचार मनात सारखा येत राहतो. मनात येणारा विचार चुकीचा आहे हे त्या व्यक्तीच्या बुद्धीला पटत असते पण मनातून तो विचार जात नाही. त्यामुळे अस्वस्थता वाढत जाते. पोझिटिव्ह थिंकिंग करायला हवे हे माहीत असते पण मनात येणाऱ्या या निगेटिव्ह विचाराचे काय करायचे हा प्रश्न काही सुटत नाही.
अशा रुग्णांची मेंदूची तपासणी केली असता त्यात मुख्यतः दोन पॅटर्न दिसतात. भीतीपोटी कृती करण्याची सवय असते, सतत नमस्कार करणे किंवा हात धुणे असा प्रकार असतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या मेंदूतील अमाय्ग्डला हा भावनिक मेंदूचा भाग अधिक सक्रीय असतो. असे स्वाभाविक आहे कारण हा मेंदूचा भाग कोणतेही संकट जाणवले की प्रतिक्रिया करतो .त्यामुळेच मनात भीती निर्माण होते! नमस्कार केला नाही तर देव शिक्षा करेल, काहीतरी वाईट घडेल अशी भीती वाटते, ती देखील या अमाय्ग्डलाचीच प्रतिक्रिया असते. मेंदूतील दुसरा पॅटर्न म्हणजे मेंदूच्या प्री फ्रंटल कोर्टक्सचे कार्य नीट होत नसते. माणसाच्या मेंदूतील या भागात वेगवेगळी केंद्रे असतात.या भागातील डॉर्सोलॅटरल प्री फ्रंटल कोर्टक्स हे मुख्य अटेन्शन सेंटर आहे. आपले अटेन्शन कोठे असावे ते हा भाग ठरवतो. प्री फ्रंटल कोर्टक्सला मेंदूचा सी.ई.ओ असे म्हणतात. कारण रोजच्या बिझनेस मध्ये कशाला महत्व द्यायचे आणि कशाला नाही हे जसे कंपनीचा सी.ई.ओ ठरवतो. तसेच कोठे लक्ष द्यायचे हे मेंदूतील हा भाग ठरवत असतो. ओसीडी चा त्रास असणाऱ्या माणसात हे केंद्र नीट काम करीत नसते .मेंदूचे एक्झ्यूक्यृटिव फंक्शन या आजारात थोडेसे बिघडलेले असते.
माणसाच्या मेंदूतील प्री फ्रंटल कोटेर्क्सची काही कामे खूप महत्वाची असतात. या कार्यात सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःला थांबवता येणे हे एक महत्वाचे काम आहे. हा मनाचा ब्रेक चांगला नसतो त्यामुळेच अनेक समस्या निर्माण होतात. ओसीडी या आजारात हा ब्रेकच सक्षम नसतो. सजगतेच्या व्यायामांनी म्हणजेच माईंडफुलनेसने मेंदूतील ब्रेक चांगला होतो., त्यामुळे ओसीडीचा त्रास कमी होऊ शकतो. माईंडफुलनेस हा मेंदूचा व्यायाम आहे. शारीरीक व्यायाम जसा फिजिओथेरपी म्हणून उपयोगी आहे तसाच तो सर्वच माणसांनी निरोगी राहण्यासाठी करायला हव. तसेच या मेंदूच्या व्यायामाचेहि आहे. तुमचा आमचा मंत्रचळ आजारात परावर्तीत होण्याचे टाळायचे असेल तर माईंडफुलनेस चा सराव अंगीकारायला हवा .
A person with OCD is constantly restless. She realizes that her behavior is wrong, but she cannot stop it. This is why discomfort grows. That person feels compulsion to take action, and she feels restless till that.
There are mainly two types of this disease. The first type is the compulsion of the action. The second type, however, does not have such compulsion. He has repeating frightening thoughts in mind, and that is troublesome
Some men keep thinking about sex .Therefore, they cannot communicate with women properly. They feel guilty for that thought but they cant get rid of it. Some may have thought about financial lost or death of loved one. So the discomfort grows.
Sattvavajay therapy has attention training, meditation. It helps to get de-fuse from the thoughts. The goal of meditation is not to control thoughts, it is to stop letting them control you.So it is helpful to reduce trouble of obsessive compulsive disorder.
RSS feed for comments on this post. TrackBack URI
By Nick, January 16, 2020 @ 2:34 pm
Very Useful Info.
Thank you